

Mindfulness Benefits and Techniques for Mental Wellbeing
esakal
ताणतणाव कमी करणे : भूतकाळातील घटना, नकोसे विचार, आठवणी, भविष्यकाळातील अनाठायी चिंता व काळजी यांचा त्रास कमी होतो. पर्यायाने ताण कमी व्हायला मदत होते.
नाते संबंधांत सुधारणा : माइंडफुलनेसचा नियमित सराव करणाऱ्या व्यक्ती अन्य व्यक्तींशी प्रेमाने आणि सौहार्दाने वागू शकतात. वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंधातील अपरिहार्य ताण तणावांचा त्यांना कमी त्रास होतो.
झोपेच्या तक्रारी : कमी झोप येणे किंवा अजिबात झोप न येणे यासाठी उपयुक्त ठरतात.
नैराश्य : नैराश्याच्या आजारात सतत जाणवणारा, मूड नसण्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. तसेच या आजारातून बाहेर पडताना कमी होणारा आत्मविश्वास परत मिळवायला उपयुक्त ठरतात.
अति खाणे किंवा अजिबात न खाणे : या दोन्ही बाबतीत थेरपी मदत करतात.
हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेह : मनावरील ताण कमी करणारं, मन शांत करणारं हे तंत्र असल्याने या विकारात अतिशय उपयुक्त ठरतं.
आनंदी जीवन : तणावमुक्त राहता यायला लागल्यामुळे व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू विकसित व्हायला मदत होते. त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी होते.