
थोडक्यात:
डास आकाराने लहान असले तरी पावसाळ्यात त्यांची संख्या वाढून मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यांसारखे आजार पसरतात.
मच्छरदाणी, कॉईल, रिपेलंटवर मोठा खर्च होतो; तरी डासांचं पूर्ण उच्चाटन शक्य झालेलं नाही.
डॉ. रोनल्ड रॉस यांनी मादा डास मलेरियाचे वाहक असल्याचा शोध लावला; त्यांची आठवण म्हणून २० ऑगस्टला ‘जागतिक डास दिवस’ साजरा होतो.
Monsoon Mosquito-Borne Disease Awareness Tips: डास आकाराने अगदी छोटा असला तरी त्याचे उपद्रव फार मोठे आहे. मच्छरदाणी, मॉस्किटो कॉईल, रिपेलंट यांसारख्या उपायांवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होत असला, तरी डासांचे समूळ उच्चाटन शक्य नाही. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढते व त्यांच्यापासून संसर्गजन्य आजारांचा प्रसार होतो. मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचे डास हे प्रमुख वाहक आहेत.
डॉ. रोनल्ड रॉस यांनी मादा डासांमुळे मलेरिया पसरतो, हा शोध लावला होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २० ऑगस्ट ‘जागतिक डास दिवस’ म्हणून साजरा केला जातो.