- डॉ. मालविका तांबे
पावसाळा आला, वातावरण थोडं थंड झाले की सगळ्यांनाच आनंद होतो, पण घराबाहेर पडायचे झाले की हाच पाऊस नकोनकोसा वाटायला लागतो. तास्-न्-तास ट्रॅफिकमध्ये उभे राहणे, चिंब भिजून घरी येणे हे तर या ऋतूत अनुभवाला येतेच, पण बरोबरच सगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार या काळात तोंड वर काढायला लागतात.