Monsoon infections | फंगल इन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्याल ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon infections

Monsoon infections : फंगल इन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्याल ?

मुंबई : हातांना खाज येणे, जळजळ होणे, जखमा होणे अशी लक्षणे असलेले रुग्ण सध्या आठवड्यातून १० ते १५ समोर येत आहेत. याबाबत वोक्हार्ट रुग्णालयाच्या सल्लागार-प्लॅस्टिक,रिकन्स्ट्रक्टिव्ह अँड एस्थेटिक सर्जन डॉ. श्रद्धा देशपांडे यांनी आपला अनुभव प्रसिद्धीमाध्यमांना सांगितला.

पावसाळ्यानंतर बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहे. बुरशीजन्य संसर्ग सामान्यत: एरिथेमॅटस रॅशेस म्हणून ओळखला जातो. जे नाण्यासारख्या गोल किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सामान्यत: शरीराच्या गुप्तांगात, त्वचेच्या दुमडल्या भागात, मांडीच्या सांध्यात, बगले मध्ये ही वर्तुळे तयार होतात.

शरीरातील ज्या भागात कायम घाम येतो किंवा शरीराचा जो भाग कायम ओलसर असतो शक्यतो असल्या भागात अधिक आणि वारंवार ही वर्तुळे तयार होत असतात. ओलावा बुरशीच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि त्यामुळे संसर्ग वाढतो.

ही वर्तुळे हात-पायांच्या बोटांमध्ये तसेच पायाच्या तळव्यात देखील होऊ शकतात. पाय जास्तवेळ ओलसर बुटांमध्ये राहिल्याने देखील हे होते, या अवस्थेला "अँथलिट फुट" असेही म्हणतात. बोटे आणि नखांमध्ये बुरशीजन्य संसर्गामुळे नखे विकृत होऊ शकतात याला "पॅरोनिचिया" म्हणतात.

उपाय काय ?

बुरशीजन्य संसर्गाच्या उपचारांमध्ये विशिष्ट अँटीफंगल क्रीम आणि डस्टिंग पावडर तसेच तोंडावाटे अँटीफंगल औषधे पेशंटला दिली जातात.

ओलसर हवामानात हे संक्रमण अधिक प्रमाणात होते. त्यासाठी आंघोळी नंतर तसेच हात-पाय धुतल्यानंतर ते व्यवस्थित सुती कपड्याने कोरडे करणे चांगले असते, ज्या व्यक्तीस संसर्ग आहे त्याचे कपडे वेगळे धुणे, तसेच कपडे घालण्यापूर्वी ते इस्त्री करणे चांगले असते.

नेहमी स्वच्छ कपडे घाला कारण बुरशीचे बीजाणू कपड्यांवर जास्त काळ चिकटू शकतात, विशेषत: जेव्हा ते धुतलेले नसतात.

खूप घट्ट कपडे घालणे टाळावे कारण ते तुमच्या त्वचेला हवेचा प्रवाह कमी करू शकतात आणि घाम वाढवू शकतात, ज्यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. सुती कपड्यांना प्राधान्य द्यावे.

प्रभावित भागात खाजवणे टाळावे कारण यामुळे संसर्ग वाढू शकतो आणि पसरण्याची शक्यता देखील वाढते. अशा प्रकारे काळजी घेतल्यास संक्रमण टाळण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Monsoon Infections What To Do In Case Of Fungal Infection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..