साखर-दारूपेक्षाही घातक आहे हा 'सायलेंट किलर'! 15 वर्षांनी करू शकतो आयुष्य कमी

Why Obesity is More Dangerous than Smoking or Drinking: लठ्ठपणा हा सायलेंट किलर असून, तो साखर व दारूपेक्षाही अधिक घातक ठरतो आणि आयुष्य 15 वर्षांनी कमी करू शकतो.
Hidden Health Risks of Being Overweight
Hidden Health Risks of Being Overweightsakal
Updated on

Effects of Long-Term Obesity on the Body: आपण सिगरेट, दारू, तंबाखू, गुटखा आणि साखर यांना शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानतो. पण एक अशी समस्या आहे, जी याहूनही अधिक जीवघेणी ठरू शकते. ही समस्या इतकी गंभीर आहे की तिचा प्रभाव तुमचं आयुष्य तब्बल 15 वर्षांनी कमी करू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगातील सुमारे 43 टक्के लोक दररोज या स्थितीत राहतात आणि ती नजरअंदाज करतात.

हळूहळू घातक ठरणारी ही स्थिती

अयोग्य जीवनशैली, बदलते राहणीमान, अनियमित जेवण आणि असंतुलित आहार यामुळे या समस्येचा प्रभाव नक्कीच जास्त जाणवू शकतो. परिणामी हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे किंवा अकस्मात मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

Hidden Health Risks of Being Overweight
Farting Benefits: गॅस सोडताना लाज वाटतेय? आता नाही वाटणार, कारण बीपी कमी होण्याशी आहे याचा थेट संबंध!

यापेक्षा अधिक धोका कोणता?

वरील दिलेल्या समस्यांपेक्षा जास्त घातक एक समस्या आहे, जिला सिगरेटच्या किंवा दारूच्या व्यसनापेक्षाही अधिक नुकसानकारक मानलं जातं. ही स्थिती तुमच्या प्रजनन क्षमतेपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत, सगळ्यावर परिणाम करते.

या समस्येमुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आणि वेळेआधीच वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ही समस्या म्हणजे लठ्ठपणा आहे. तुमचं वजन जर गरजेपेक्षा १० किलो जरी जास्त असेल, तरी ते दीर्घकाळात शरीराला आतून झिजवत जातं. आणि त्यामुळे ही स्थिती अनेक आजारांना आमंत्रण देते.

Hidden Health Risks of Being Overweight
Kids Health Alert: कृत्रिम खाद्य रंग मुलांसाठी ठरतोय 'स्लो पाॅइझन'? काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन

निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

  • संतुलित आहार

  • नियमित चालणे किंवा व्यायाम

  • झोपेची गुणवत्ता सुधारणे

  • तणाव कमी करणे

  • स्क्रीन टाइम कमी ठेवणे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com