child
sakal
मी आपले सर्व कार्यक्रम नियमित बघते, गणेशचतुर्थीच्या दिवशी दिलेली प्रसादांची माहिती फार आवडली. माझी आई ६७ वर्षांची आहे. तिचे हिमोग्लोबिन सध्या कमी होते आहे. बऱ्याचदा टॉनिक्स व इंजेक्शन्स दिली, पण थोड्या दिवसांत परत तिचे हिमोग्लोबिन कमी झालेले दिसते. तिचा अशक्तपणा कमी होत नाही. यावर काय उपचार करता येऊ शकेल?
- प्रणाली शिंदे, नवी मुंबई
उत्तर – स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची बरीच कारणे असतात. त्यामुळे एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे जास्त उत्तम राहील. कारण, निदान झाल्यावर उपचार करणे जास्त सोपे असते. त्यांना रोज आहारात सफरचंद, डाळिंब, अंजीर, काळ्या मनुका, तुपाबरोबर खजूर, पालक, मेथी, बीट रूट यांचे सेवन नियमित करायला सांगावे.
सकाळी रोज अनाशेपोटी अर्धा ते एक चमचा कोरफडीचा गर तूप व हळद यांच्या बरोबर घेतलेला उत्तम. तसेच रोज संतुलनच्या लोहित प्लस गोळ्या, संतुलन धात्री रसायन किंवा सॅन रोझ रसायन नियमित घेण्याचा फायदा होताना दिसतो. केशरयुक्त अमृतशर्करा घालून केलेले पंचामृत रोज सकाळी घेण्याचा फायदा होऊ शकेल.