Mumbai Reportes Decline in HIV Infections
sakal
जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार शहरात नव्याने आढळणाऱ्या एचआयव्ही संसर्गाच्या प्रकरणांत सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचण्या, उपचार मोठ्या प्रमाणात होत असल्याने संक्रमणाचा धोका कमी झाला असून मुंबई '९५-९५-९५' जागतिक लक्ष्याच्या जवळ पोहोचत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.