Mutton Benefits : मटन खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mutton Benefits

Mutton Benefits : मटन खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Mutton Benefits : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये प्राचिन काळापासून मांस खाल्ले जाते. भारतीय स्वयंपाकघरात अशा बर्‍याच पाककृती आहेत ज्या परदेशी लोकांना माहिती नसतील. सगळे आपल्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवतातजेवढे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी उपलब्ध आहेत, तेवढेच पदार्थ मांसाहारी पसंत असलेल्या लोकांसाठी आहेत. प्रत्येकाच्या घरात एखादा तरी असतो ज्याला मटन खाणे आवडत असते. त्याच घरात शाकाहारी खाणारेही असतात.

बकर्‍याचे मांस खाणार्‍याना माहीत असेल की यामध्ये कितीतरी प्रकार असतात. जसे मटन बिरयानी, मटन करी, कीमा आणि मटन कोरमा. बकर्‍याचे मांस आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पण खूप कमी लोकांना माहिती असेल की, बकर्‍याचे लेग पीस खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.

रक्ताची कमी भरून काढते

अनेक लोकांच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी होते. यामूळे पेशी कमी होणे, अशक्तपणा येणे असे आजारही होतात. यावर मटन खाणे फायद्याचे आहे. कारण मटणात भरपूर लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. आठवड्यातून 2 दिवसही मटण खाल्ले तर रक्ताची कमतरता भासणार नाही.

बॉडी बनवण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरी वर्कआऊट करत असाल आणि चांगली बॉडी बनवायची असेल. तर तुमच्या आहारात मटणाचा समावेश करावा. मटणात उच्च दर्जाचे प्रथिने आढळतात. आणि तेही खूप जास्त प्रमाणात. त्यामुळे स्नायू लवकर मजबूत होतात. मटन उकडून खाल्ल्यानेही लवकर बॉडी बनण्यास मदत होते.

शरीराची ताकद वाढवण्यासाठी

मटनामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी मटन खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

उष्णता निर्माण करते

थंडीमध्ये मटन खाल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. डॉक्टरसुद्धा सर्दी मध्ये मटन खाण्याचा सल्ला देतात आणि लेगचे सूप सेवन करायला सांगतात. हे फक्त शरीराला ताकद देत नाही तर मेंदूला शक्ति प्रदान करते.