
Cough Syrup Alert
sakal
Contaminated Cough Syrup in India: कफ सिरप प्राशन करून नागपुरातील विविध रुग्णालयात आजपर्यंत छिंदवाडा परिसरातील सुमारे ३६ रुग्ण दाखल झाले आहेत. यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेथ ऑडिटमध्ये या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या ० ते १६ वर्षे वयोगटातील १२ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात दाखल असून मध्यप्रदेशातील १०, महाराष्ट्रातील १ आणि तेलंगणाचा १ रुग्ण आहे. या प्रकरणाची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे तीन सदस्यीय पथक सोमवारी (ता.६) दाखल झाले.