Nagpur Heart Surgery: तावी प्रक्रियेद्वारे वृद्धाचे वाचविले प्राण; हृदयासह धमनीवर एकाचवेळी उपचार, भारतातील पहिली शस्त्रक्रिया
Nagpur News: नागपूरमधील डॉ. के. जी. देशपांडे मेमोरियल सेंटरमध्ये ८७ वर्षीय रुग्णावर भारतातील पहिली TAVI शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या प्रक्रियेत प्रगत व्हॉल्व्ह वापरून ओपन-हार्ट शस्त्रक्रियेची जोखीम टाळण्यात आली.
नागपूर : अठ्यात्तर वर्षीय रुग्णाला वारंवार चक्कर येणे आणि श्वास घेण्यात त्रास होत होता. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणारी सर्वात मोठी धमनी अरुंद होऊन रक्ताभिसरण थांबल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.