Cancer Patients : कॅन्सरग्रस्तांच्या वेदना कधी होणार कालबाह्य?

Cancer Patients : विदर्भासह चार राज्यातील कॅन्सरबाधितांच्या उपचारावर वरदान ठरणारी ‘लिनिअर उपचार यंत्रणेच्या खरेदीची निविदा फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रकाशित होऊन दोन महिने लोटून गेले.
Cancer Patients
Cancer Patientsesakal

Cancer Patients : विदर्भासह चार राज्यातील कॅन्सरबाधितांच्या उपचारावर वरदान ठरणारी ‘लिनिअर एक्‍सिलिरेटर’ उपचार यंत्रणेच्या खरेदीची निविदा फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रकाशित होऊन दोन महिने लोटून गेले. परंतु अद्यापही खरेदीचा पत्ता नाही. त्यामुळे मेडिकलमध्ये आलेल्या कॅन्सरग्रस्तांवर अद्यापही कालबाह्य कोबाल्ट युनिटवरच उपचार होतात. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांना यातना कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २०१२ मध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट मंजूर झाल्यानंतर राज्याच्या आदिवासी आणि सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून २०१७-१८ मध्ये ‘लिनिअर एक्‍सिलिरेटर’ खरेदीसाठी २३ कोटींचा निधी मेडिकलला मिळाला. हा निधी हाफकिनकडे वळता केला, परंतु हाफकिन ‘लिनिअर एक्‍सिलिरेटर’ यंत्र खरेदी करण्यात नापास झाले.

यामुळे हा निधी पुन्हा मेडिकलच्या तिजोरीत जमा झाला. हा निधी इतरत्र पळविण्याचे मनसुबे रचले गेले, परंतु त्यांना यश आले नाही. मात्र यानंतर न्यायालयाने तातडीने ‘लिनिअर एक्‍सिलिरेटर’ खरेदी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी समिती गठित केली. काही त्रृटी आढळल्यानंतर त्या दुरुस्त झाल्या. त्यानंतरही ‘लिनिअर एक्‍सिलिरेटर’ची खरेदी अद्याप झालेली नाही.

Cancer Patients
Colon Cancer : आतड्यांच्या कॅन्सरचा वाढतोय धोका, जाणून घ्या लक्षणे

खरेदीत विघ्न आणणारे शुक्राचार्य कोण?

सध्या मेडिकलमध्ये रेडिओथेरपी विभागात दर दिवसाला ६० ते ७० रुग्णांवर कोबाल्टवर लाईट देऊन उपचार केले जातात. त्यातच ब्रॅकी थेरपी बंद पडून आले. यामुळे रुग्णांना येथे अतोनात यातना सहन कराव्या लागत आहे. खासगी रुग्णालयातील कॅन्सरवरील उपचार सामान्यांच्या आवाक्यात नाही. यामुळेच मेडिकलमध्ये कॅन्सरग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एवढा काळ लोटूनही यंत्रणेची खरेदी होत नसल्याने खरेदीच्या धोरणात विघ्न आणणारे शुक्राचार्य कोण, अशी जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात विभागप्रमुखांशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com