
Acute Encephalitis Syndrome
sakal
नागपूर : ऑरेंज सिटी, स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, अशा विविध नावाने ओळख पावलेल्या नागपूर शहरात दरवर्षी डेंगी, स्क्रब टायफस, जपानी मेंदूज्वरपासून तर डेंगु आणि स्वाईन फ्लू पासून तर चिकन गुनियासारख्या साथ आजारांचा प्रकोप येतो. या आजारांशी लढण्यासाठी आणि शहरवासीयांना आजारांपासून बरे करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात उपचाराची यंत्रणाच नाही. नुकतेच उपराजधानीत मेंदूज्वराचे आठ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती पुढे आली आहे.