esakal | नखं देतात तुमच्या आरोग्याचे संकेत

बोलून बातमी शोधा

Nails
नखं देतात तुमच्या आरोग्याचे संकेत
sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : माणसाला पाहून त्याच्या विषयी खूप काही सांगितले जाऊ शकते. त्याचे हावभाव, त्याची चालण्याची तऱ्हा, बोलण्याची तऱ्हा यातून कळू शकते. अशाच पद्धतीने तुमची नखही खूप काही सांगतात. तुम्ही कधी विचार केला का, की नख बरे कसे काय आपल्या विषयी सांगू शकते. मात्र हे खरे आहे.

वरिष्ठ फिजिशियन डाॅ. एन.एल.अमोली सांगतात, की तुमचे नख तुमच्या आरोग्याविषयी खूप काही सांगतात. मात्र आपण त्याकडे गांभीर्याने घेत नाहीत आणि ना नखांची काळजी घेतो. नखांवरील ओरखडे, ती सारखी-सारखी तुटण्याकडे आपण कधीच गांभीर्याने घेत नाही. मात्र डाॅक्टरांच्या ऐकले तर ती आपल्याला खूप काही सांगून जाते.

नखांमध्ये कोणता बदल होऊ शकतो


अनेकदा नखांवर रेषा पडतात. कधी त्यांच्या रंगात बदल होतो. कधी ती वेगळीच दिसू लागतात. अनेकदा नखे वाढल्यानंतर तुटून जातात. कधी कधी नखे दुःखतात. तुम्ही कधी या बदलांकडे कधी लक्ष दिले आहे का? बहुतेकदा नसेलच. हे बदल तुमच्या शरीरातील कमतरतेमुळे होऊ शकतात.

रेषांचा रंग सांगतात तब्येतीविषयी


नखांच्या रेषा वेगवेगळ्या रंगांच्या असतात. जर तुमच्या नखांत पांढऱ्या रेषा असतील तर तुमच्यात पौष्टिक तत्त्वे कमी असतील. दुसरीकडे नखांवरील निळा रेषा उच्च रक्तदाबाकडे इशारा करते.

चौकानी रेषांचा अर्थ काय


केरोटीन नावाचे प्रोटीनच्या कमतरतेमुळे नखांवर चौकोनी रेषा तयार होतात. यात नखांवर अनेक रेषा तयार होतात. ही समस्या वाढल्यानंतर नखांसाठी नवीन सेल्स निर्माण होणे बंद होऊन जाते.

गुलाबी रेषा


जर तुमच्या नखांच्या खाली लाल किंवा बदामी रेषा दिसत असेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला सांध्यांशी संबंधित त्रास सुरु होऊ लागला आहे किंवा झाला आहे. अनेकदा ही रेषा सहज बनून जाते. जर असे कधी झाले तर तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला जरुर घ्या.


मोठे नख


तुमचे नख कडक आणि मोठे आहेत का? तर लगेच डाॅक्टरांना भेटा. नखांची ही स्थिती फंगल इंफेक्शनमुळे होते. याचे इतर अनेक कारणे आहे जसे की डायबिटीज, फुफ्फुसात संसर्ग, एग्झिमा आदीही होऊ शकते.

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.