National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

National Dengue Day 2024 : डेंग्यू हा संसर्गजन्य डासांच्या चाव्यामुळे होणारा एक गंभीर आजार आहे.
National Dengue Day 2024
National Dengue Day 2024esakal

National Dengue Day 2024 : सध्या देशातील काही भागांमध्ये प्रचंड उकाडा आहे, तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाने चिंता वाढवली आहे. या अशा संमिश्र वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या वातावरणामध्ये डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूची लागण होण्याची शक्यता असते. डेंग्यू हा संसर्गजन्य डासांच्या चाव्यामुळे होणारा एक गंभीर आजार आहे.

या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे, रूग्णांना वेळेत उपचार मिळणे, आवश्यक आहे. डेंग्यूचा हा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन आणि या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ मे हा दिवस 'राष्ट्रीय डेंग्यू दिन' म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचा मुख्य उद्देश हा आहे की, लोकांना या आजाराविषयी जागृत करणे आणि या आजाराची लक्षणे ओळखून त्यावर उपचार कसे करता येतील? याची जाणीव करून देणे हा आहे. या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत की, ज्या केल्यावर तुमचा डेंग्यूपासून बचाव होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

National Dengue Day 2024
Health Tips : मधुमेहावर करायचीय मात तर हे पदार्थ असायलाच हवेत आहारात, लवकर फरक जाणवेल!

मच्छरदाणीचा करा वापर

डेंग्यूचा आजार टाळण्यासाठी आणि डेंग्यूच्या डासांना स्वत:पासून दूर ठेवण्यासाठी मच्छरदाणीचा वापर अवश्य करा. नेहमी झोपताना मच्छरदाणी लावून झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुमचे डासांपासून आणि इतर कीटकांपासून संरक्षण होईल आणि डेंग्यूच्या डासांपासून बचाव करण्यास मदत होईल.

बाहेर जाताना अशी घ्या काळजी

जेव्हा तुम्ही दिवसा किंवा संध्याकाळी घराबाहेर पडाल, तेव्हा शक्य तितके झाकणारे कपडे घालण्यास प्राधान्य द्या. तुम्ही फूल बाह्यांचे शर्ट, कुर्ती, टीशर्ट, ड्रेस इत्यादी असे कपडे घाला. यासोबत लांब पॅंट, पायांमध्ये मोजे आणि शूज घाला. यामुळे, तुमचे शरीर झाकलेले राहिल आणि डास किंवा इतर कीडे तुम्हाला चावणार नाहीत.

लिंबू आणि निलगिरीचा करा वापर

डासांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि निलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि निलगिरीचे तेल मिसळा. त्यात थोडे पाणी मिसळा. आता हे मिश्रण एका रिकाम्या बॉटलमध्ये भरून त्याची घरात फवारणी करा. डासांपासून दूर राहण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

खरे तर डासांना लिंबू आणि निलगिरीच्या तेलाचा वास आवडत नाही. त्यामुळे, ज्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींचा वास असतो. तिथे डास फार काळ टिकत नाहीत, डास पळून जातात.

National Dengue Day 2024
Mosquitoes Remedies : घरात सायंकाळी भरते डासांची जत्रा, हे उपाय कराल तर डास चुकूनही घरात पाय ठेवणार नाहीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com