National Doctor's Day : चौदा वर्षांची प्रतीक्षा संपली.. पुण्यात आयुर्वेदाने केली वंध्यत्वावर मात

अपत्यप्राप्तीसाठी फार काळ वाट बघणाऱ्या दाम्पत्यांसाठी वंध्यत्व हे भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या प्रचंड थकवणारे असते
National Doctor's Day
National Doctor's Dayesakal

A Success Story of Ayurvedic Treatment For Infertility : अपत्यप्राप्तीसाठी फार काळ वाट बघणाऱ्या दाम्पत्यांसाठी वंध्यत्व हे भावनिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या प्रचंड थकवणारे असते. सामाजिक आणि भावनिक ताणातून हे दांपत्य जात असते. जिथे १४ वर्षे प्रयत्न करूनही अॅलोपॅथीने हात टेकले तिथे आयुर्वेदाने मात्र हा वैद्यकीय चमत्कार करून दाखवला.

पुण्यातल्या एका आयुर्वेदिक सेंटर मध्ये झालेल्या या उपचाराने एका महिलेला मातृत्वाचे सुख अनुभवणे शक्य झाले. जाणून घ्या काय आहे प्रकरण.

गेली १४ वर्षे गर्भधारणेचे अनेक अयशस्वी प्रयत्न करूनही माया फुगे यांच्या पदरी निराशाच आली. त्यांनी पुण्यातल्या आयुर्वेदिक पंचकर्मासारख्या प्रभावी उपचारपद्धतीमुळे वंध्यत्वावर विजय मिळवला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास म्हणजे वंध्यत्वाच्या आव्हानांवर आयुर्वेदाची  परिवर्तनशील शक्ती कशी काम करते, याचे एक उत्तम उदाहरण आहे.

प्रजननक्षम आरोग्याच्या दृष्टीने, भारतीय आयुर्वेद महत्त्वाचा आहे. आरोग्य आणि प्रजननक्षमतेचा विकास करण्यासाठी देह, मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवादाला महत्त्व  देण्यावर आयुर्वेदिक उपचारपद्धती भर देते. व्यक्तिगत उपचारपद्धतींच्या जोरावर वंध्यत्वाची मूळ कारणे शोधून शरीरात संतुलन आणि चैतन्याचे पुनर्संचयन करणे हे आयुर्वेदाचे ध्येय आहे.

National Doctor's Day
National Doctors' Day : भारतात आज का साजरा होतो राष्ट्रीय डॉक्टर्स डे? जाणून घ्या महत्व

या यशा विषयी प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुजित शिंदे वंध्यत्वाच्या उपचारातील आयुर्वेदाचे महत्त्व  अधोरेखित करताना सांगतात, "प्रजननसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि समस्येचे मूळ शोधण्याबरोबरच, आयुर्वेद हे प्रजननक्षमते प्रति एक सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते. प्राचीन  ज्ञान आणि वैयक्तिकरित्या घेतल्या जाणाऱ्या काळजीमुळे वंध्यत्वाच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या दाम्पत्यांच्या आयुष्यात आयुर्वेदिक उपचारांनी आशा आणि आनंद आणला आहे. कित्येक वर्षांपासून निराशे मध्ये अडकलेल्या दाम्पत्यांना पालकत्वाच्या वाटेवर चालताना  बळ देतील, असे सर्वसमावेशक आयुर्वेदिक उपचार आम्ही पुरवतो."

National Doctor's Day
National Doctor Day: तिसऱ्या लाटेत मुलांवरील धोका टाळणे शक्य

आयुर्वेदिक पंचकर्म उपचारपद्धती ही प्रारंभिक आयुर्वेदिक लेखांवर आधारित शुद्धीकरण प्रक्रिया त्यांच्या उपचारपद्धतीची कोनशिला बनली. शरीरातील ताणतणाव तसेच विषारी घटक दूर  करून संतुलन आणि आरोग्य वाढवणे तसेच शरीर, मन आणि आत्म्याला टवटवीत करणे हे या  उपचारपद्धतीचे उद्दिष्ट आहे.

आपल्या शरीरातील संतुलन आणि चैतन्य पुनर्संचयित व्हावे या उद्देशाने आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टीकोन अंगिकारत माया फुगे यांनी अतूट निर्धार आणि परिश्रमाने मातृवेद  क्लिनिकच्या  आयुर्वेदिक उपचारपद्धतीचे पालन केले. लवकरच त्यांची प्रकृती सुधारली आणि गर्भधारणेची  आशा पुन्हा जागृत झाल्याने या उपचारपद्धतीचा परिणाम स्पष्ट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com