TB Free India : आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा उघड, निक्षय मित्रांचा फॉलोअपच नाही, तपासणी यंत्रणा ठप्प!
Akola health: राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाकडे अकोला जिल्ह्यात गंभीर दुर्लक्ष; रुग्णांना उपचार, पोषण सहाय्य आणि तपासणीपासून वंचित ठेवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर.
अकोला: टीबीमुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवला जात आहे. मात्र, या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे वास्तव आहे.