

Normal Delivery in Government Hospital
sakal
Normal Delivery Preference Trend: प्रसूती म्हटले की, महिलेचा एकप्रकारे पुनर्जन्मच असतो. त्यातच अनेक महिलांना प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना असहनीय असतात. त्यामुळे बहुंताश खासगी रुग्णालयाचा कल हा सर्वाधिक सीझर प्रसूती करण्यावर असतो. त्यातच आता, सीझर ही पद्धतच रूढ होताना दिसत आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सीझरपेक्षा नैसर्गिक प्रसूतीलाच पहिली पसंती दिली जात आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात ४७ हजार ८६४ प्रसूती करण्यात आल्या आहेत. यापैकी ३२ हजार ४५३ प्रसूती या नैसर्गिक करण्यात आल्या आहेत.