
Health Benefits of Eating Chickpeas
sakal
Chickpeas for Pregnancy Health, Power and Cell Protector: चणे, चणाडाळ, हरभराडाळ आपल्या नित्य वापरण्यात येणाऱ्या आहारीय पदार्थाचा एक भाग होय. हिरवे चणे-काळे चणे-काबुली चणे-छोले चणे आणि त्याचेच दोन भाग केलेली चणा डाळ! खारवून भाजले, की फुटाणे आणि भाजकी डाळ ही चिवडा व चटणीसाठी उपयुक्त. चण्याची डाळ दळून पीठ तयार केले, की तेच आपण बेसन म्हणून पदार्थांत वापरतो. दिवाळीत बेसनाचा लाडू तर हवाच. अर्थात चणे आरोग्यवर्धक असले, तरी काहींना कमकुवत पचनशक्तीमुळे त्रास देतात; परंतु ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, त्यांनी विशेषतः स्त्रियांनी याचा उपयोग जाणून घेऊन योग्य वापर करावा.