tulas
sakal
- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेद म्हंटल की सगळ्यांना लक्षात येतं ते म्हणजे आरोग्याशी किंवा औषधाशी निगडित शास्त्र, पण खर पाहायला गेलं तर आयुर्वेद हे आरोग्याला निसर्गाशी कसं जोडता येऊ शकेल याबद्दलचे शास्त्र आहे. निसर्गात असलेले पशु, पक्षी, मानव, झाडं, पानं, फुलं, डोंगर, नद्या हे सगळे जरी आपल्याला सजीव किंवा निर्जीव वाटले तरी या सगळ्यांमध्ये होत असलेले देवाण-घेवाण हा खरं सृष्टिचक्राचा मूळ आहे.