काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी पत्नी नवज्योत कौर यांचा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला होता. नवजोत सिद्धू यांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण खरंच असं होऊ शकतं का?
खरंच घरगुती आहाराने कॅन्सर सारख्या आजाराला मात देता येऊ शकते का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनातही आला असेल. त्याच प्रश्नावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालकांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. कर्करोगाच्या रुग्णांनी अशा कोणत्याही 'अप्रमाणित उपचारांवर' विश्वास ठेवण्याची चूक करू नका, असा सल्ला दिला डॉक्टरांनी दिला आहे.