

HEALTHY NAVRATRI UPVAS DIET TIPS FOR BETTER GUT HEALTH
sakal
नवरात्रोत्सवात देवीची आराधना, गरबा-दांडिया आणि उपवासाच्या चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. या काळात साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचे पदार्थ, तळलेले फराळ आणि मिठाई खाणे वाढू शकते. अशा पदार्थांचे सेवन जास्त झाल्यास पोट भरल्यासारखे वाटणे, गॅस होणे किंवा पचन बिघडणे अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे नवरात्रीत जेवणात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त ठरते.