Eating Dahi with salt : तुम्हालाही मीठ घालून दही खाण्याची सवय आहे? आताच बदला नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eating Dahi with salt

Eating Dahi with salt : तुम्हालाही मीठ घालून दही खाण्याची सवय आहे? आताच बदला नाहीतर...

आपल्यापैकी अनेकांना मीठ घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय अत्यंत धोकादायक असतं. अनेकजण दह्यात मीठ घातल्याने दही विष बनतं, असाही दावा करतात. हे कितपत खरंय? आणि दह्यात मीठ घालून खाल्याने काय होतं, हे जाणून घेऊया

अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी साखर, गूळ किंवा गोड पदार्थांसोबतच खावे. तुम्हालाही मीठ घालून दही खाण्याची सवय आहे का? जर असेल तर आताच बदलावी लागणार.

हेही वाचा: Best Time To Eat Curd : दही जेवणाआधी खावे की जेवणानंतर?

जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू फिरताना दिसतात. हे जीवाणू जिवंत स्थितीत आपल्या शरीरात गेले पाहिजेत, कारण जेव्हा आपण दही खातो तेव्हा आपल्यातील एन्झाइमची प्रक्रिया सुरळीत चालते.

या जीवाणूंसाठी आपण दही खातो. आयुर्वेदाच्या भाषेत दही हे बॅक्टेरियाचे घर मानले जाते, एका कप दह्यामध्ये तुम्हाला करोडो बॅक्टेरिया दिसतील.

हेही वाचा: Curd in winter: हिवाळ्यात दही खावं की नाही? काय सांगतं आयुर्वेद अन् विज्ञान...

दह्यामध्ये चिमूटभर मीठ घातल्यास एका मिनिटात सर्व बॅक्टेरिया मरतात आणि त्यांचे मृतदेह आपल्या शरीरात जातात ज्यामुळे त्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. दह्यामध्ये चिमूटभर मीठ टाकल्यास दह्यातील सर्व जीवाणूजन्य गुणधर्म नष्ट होतात कारण मिठात असलेले रसायन हे जीवाणूंचे शत्रू असतात.

हेही वाचा: Rice Curd Benefits : दहीभात खाणे गुणकारी ठरतेय; अनेक आजारावर जालीम उपाय!

आयुर्वेदात असे सांगितले आहे की दह्यामध्ये अशा गोष्टी घालाव्यात, ज्यामुळे त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही गुळासोबत खा, गूळ घातल्याबरोबर बॅक्टेरियाची संख्येत वाढ होते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

टॅग्स :saltcurdcurd benefits