New Bride Health : नुकत्याच लग्न झालेल्या मुलींना होतोय हा आजार, रूग्णालयात वाढतेय नववधुंची गर्दी

ॲडजस्टमेंट डिसऑर्डर सारख्या गंभीर आजाराची नववधुंना होतेय लागण
New Bride Health
New Bride Healthesakal

New Bride Health :

एका मुलीला लग्नानंतर अनेक गोष्टींमध्ये ऍडजस्ट करावे लागते. सासरकडील मंडळींच्या सवयींपासून त्यांचे वागणे, बोलणे या गोष्टीही समजून घ्याव्या लागतात. त्याच गोष्टींमुळे आजकाल नववधुंना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्याची अनेक प्रकरणे दररोज दवाखाण्यात दाखल होत आहेत. 

नववधुंना या बदलामुळे मानसिक आजारांची लागण होत आहे. या आजारात झोपेचा अभाव, चिडचिड, डोकेदुखी आणि अस्वस्थता ही मानसिक विकाराची मुख्य लक्षणे आहेत,असे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसिक आरोग्य विभागाच्या एचओडी डॉ. पूजा सिंग यांनी सांगितले.

New Bride Health
Nashik Health Department : जिल्ह्यातील बालकांना ओआरएस, झिंक गोळ्या

डॉ. पूजा यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळात महिलांमध्ये सहनशीलता अधिक होती. पूर्वी काही अडचण आली तर स्त्रिया सहन करत असत, पण नवीन महिलांमध्ये हे प्रमाण कमी आहे. नववधूंचा तग धरण्याची क्षमता नाही आणि त्या कुणापुढे झुकायला तयार नसतात. त्यामुळे वाद वाढतात आणि असे मानकिस आजार सुरू होतात.

डॉ. पूजा म्हणाल्या की, एकत्र कुटुंबात राहिल्याने अतिरिक्त कामाचा ताण वाढतो. घरातील सासूही सुनेला तिच्या पद्धतीने काम करून घ्यायला सांगते. काहीवेळा मुलींना याचे दडपण येते. जर नववधू हे काम करू शकत नसेल तर तिला ऐकावे लागेल.

New Bride Health
Groom Bride Video : नवरदेवाच्या डोळ्यात गेली माशी अन् नवरी झाली अशी तशी की...

अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात लग्नानंतर काही महिन्यांनी पती बाहेर जातो. नववधू त्यांच्या भावना कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. काही सांगता येत नसल्यामुळे, त्याला झोप न लागणे आणि चिडचिडेपणाची लक्षणे अधिक जाणवत आहेत.

दररोज सुमारे 60 रुग्ण येतात, त्यापैकी 20 ते 25 नववधू असतात. नववधूला ॲडजस्टमेंट डिसऑर्डरसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना समजावून सांगितले जाते आणि समुपदेशन केले जाते.

New Bride Health
Ayurvedic Herbs Brain Health : मेंदूच्या आरोग्यासाठी 4 आयुर्वेदिक वनस्पती

या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे झोप न लागणे, डोकेदुखी, बेहोशी, अस्वस्थता आणि चिडचिड अशी आहेत. त्यांना औषधापेक्षा कुटुंबाशी संवादाची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांनी विशेषत: त्यांच्या घरात राहणाऱ्या नववधूंशी बोलून त्यांची काळजी घ्यावी.

तसेच, नववधुंनीही काही गोष्टी माहेरच्या मंडळींना सांगून मोकळं व्हावं. कारण, उगीच याचे त्या दडपण घेणार नाहीत. त्यामुळे, त्यांना मानसिक आजाराचा सामना करावा लागणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com