New Year Resolution : नव्या वर्षात घ्या नवा संकल्प, आजपासूनच खा 'या' गोष्टी अन् वर्षभर निरोगी राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Resolution

New Year Resolution : नव्या वर्षात घ्या नवा संकल्प, आजपासूनच खा 'या' गोष्टी अन् वर्षभर निरोगी राहा

New Year Resolution : नव्या वर्षात लोक वेगवेगळे संकल्प करतात. जीवनात संकल्प करताना आरोग्याबाबत संकल्प नक्कीच करायला हवा. कारण आरोग्य धनसंपदम असे म्हटले जाते. आणि ते योग्यसुद्धा आहे. आरोग्याची काळजी योगरित्या घेतल्यास तुम्ही वर्षभर निश्चिंत राहू शकता. तेव्हा नव्या वर्षात या हेल्दी गोष्टी खाण्याचा संकल्प तुम्ही करायला हवा.

हेल्दी फूड - प्रत्येकाने चणे, दाळिया, ओट्स, किनोओ यांसारखे पदार्थ खायला हवे. हे सुपरफुड तुम्हाला अनेक रोगांपासून तुमचा बचाव करते. तुमचं वय जसजसं वाढतं तसतशीची तुमची इम्युनिटी कमी होत जाते. (Health)

ड्रायफ्रूट्स - ड्रायफ्रूट हे प्रत्येक वयाच्या लोकांनी खायला हवे. नट्स शरीराला पोषण आणि उर्जा देण्याचं काम करतं. ड्रायफ्रूट्स हृदयरोग आणि मधुमेहापासून तुमचा बचाव करते.

हिरव्या भाज्या - हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फार चांगल्या असतात. मेथी, पालक, पत्तागोबीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. तुमच्या आरोग्याला बूस्ट करण्याचं काम या भाज्या करतात. (Vegetable)

हेही वाचा: Mental Health : निरोगी लोकांनाही येऊ शकतो एंजाइटी अटॅक; वेळीच सावध व्हा!

फळे - फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. यातील फायबर आतड्यांचं आरोग्य निरोगी ठेवतं. टमाटर शरीरावरील सूजन कमी करते.

पनीर - पनीर हा एक डेअरी प्रोडक्ट आहे. व्हेजिटेरीयन लोकांसाठी पनीर हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. तुमच्या हाडांना मजबूत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.