
17-Year-Old Girl Without Periods Diagnosed with Rare Androgen Insensitivity Syndrome (AIS)
Sakal
थोडक्यात:
मासिक पाळी ही महिलांच्या प्रजनन वयात दर महिन्याला होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे.
मिर्झापूरमधील १७ वर्षीय मुलीला अजूनही मासिक पाळी न आल्याने डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली.
तपासणीत समोर आलं की ती बाहेरून मुलगी दिसत असली तरी आतून पुरुषी गुणसूत्र असलेला दुर्मिळ केस आहे.
Teenage Girl no periods diagnosed as male rare case: पीरियड्स किंवा मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, जी प्रजनन वयाच्या दर महिन्याला होत असते. साधारणतः ९ ते १६ वर्षांच्या दरम्यान मुलींना पहिली मासिक पाळी येते. मात्र उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये एक असाधारण गोष्ट घडली आहे.
मिर्झापूरमधल्या एका १७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आलेली नाही. त्याचसाठी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली, तेव्हा तपासणीमध्ये आश्चर्यकारक आणि दुर्मिळ गोष्टीचा उलगडा झाला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये असे समोर आले की ती बाहेरून पूर्णपणे मुलगी दिसत असली, तरी आतून मुलगा आहे. नक्की काय आहे ही दुर्मिळ परिस्थिती, ते जाणून घेऊया.