

World Hepatitis Day 2026
sakal
World Hepatitis Day 2026: हिपॅटायटिस म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कावीळ, सतत थकवा आणि पोटात दुखणं अशी लक्षणं येतात. पण व्हायरल हिपॅटायटिसचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे अनेक लोकांना वर्षानुवर्षं कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
या "सायलेंट" टप्प्यातही व्हायरस यकृताचं (लिव्हरचं) नुकसान करत राहतो. पुढे जाऊन यामुळे फायब्रोसिस, सिरोसिस किंवा हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (लिव्हर कॅन्सर) होऊ शकतो. अनेकदा आजार खूप पुढे गेल्यावरच लक्षणं दिसायला लागतात. म्हणूनच आता आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लक्षणांची वाट न पाहता वेळेवर स्क्रीनिंग करण्यावर भर दिला जातो.