
Cancer Symptoms : साधासा वाटणारा ताप असू शकतो गंभीर कर्करोगाचे लक्षण; मुळीच दुर्लक्ष करू नका
मुंबई : ताप सामान्य आहे आणि तो तीन-चार दिवसांत किंवा आठवड्यातू बरा होतो. शरीराचे तापमान वाढणे याला वैद्यकीय भाषेत पायरेक्सिया म्हणतात.
ताप येण्याची अनेक कारणे आहेत आणि शरीरात कोणत्याही प्रकारचा कर्करोग वाढल्यानेही ताप येऊ शकतो. (normal fever can be a symptom of blood cancer )
कर्करोग शरीराच्या ऊतींवर हल्ला करतो आणि हळूहळू त्यांचे नुकसान करतो आणि वाढत राहातो. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला ताप येऊ शकतो. हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !
असे मानले जाते की रक्ताच्या कर्करोगासह अनेक प्रकारचे कर्करोग शरीराचे तापमान वाढवू शकतात. चिंतेची बाब म्हणजे अनेकांना हा ताप हवामानातील बदलामुळे आहे की सर्दी-फ्लूमुळे आहे की शरीरातील कर्करोगामुळे आहे हे समजत नाही.
कॅन्सरमधील ताप हा सामान्य तापापेक्षा कसा वेगळा असतो आणि तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ या.
रक्ताच्या कर्करोगात तापाची अधिक शक्यता
ताप हे सर्व प्रकारच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे. ल्युकेमिया आणि लिम्फोमासारख्या रक्त कर्करोगात हे लक्षण सर्वात सामान्य असते.
जेव्हा कर्करोगाच्या रूग्णांमध्ये पायरेक्सिया असतो, तेव्हा हे सामान्यतः कर्करोग उद्भवल्याचे किंवा पसरल्याचे लक्षण असते. या प्रकारच्या तापामुळे अस्वस्थता येते. पीडित आणि त्याची काळजी घेणाऱ्यांसाठी चिंतेचे कारण असू शकते.
इतर प्रकारच्या कर्करोगात ताप कसा असतो ?
ब्रेस्ट कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर यांमध्ये ताप येण्याची शक्यता कमी असते. या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा ट्यूमर यकृतामध्ये पसरला असल्यास त्याला ताप येऊ शकतो. कर्करोगामुळे शरीरात कुठेतरी अडथळा निर्माण होत असल्याचेही हे लक्षण असू शकते.
ताप कशामुळे येतो ?
काही प्रकारच्या कर्करोगामुळे जास्त ताप का येतो हे स्पष्ट नाही. असे मानले जाते की काही रोग विषारी पदार्थ तयार करतात, ज्यामुळे ताप येऊ शकतो. असे म्हटले जाते की ट्यूमरच्या निर्मितीमुळे पायरोजेन्स होऊ शकतात. हा एक विषारी पदार्थ आहे ज्यामुळे ताप येतो.
हॉट फ्लॅशेज किंवा रात्री घाम येणे
ताप हे शरीरातील दाहक प्रतिक्रियांचे लक्षण आहे. शरीरातून उष्णता काढून टाकण्यासाठी शरीर घामाने तापास प्रतिसाद देऊ शकते. हेच कारण आहे की कर्करोगाच्या रुग्णांना निदानापूर्वी अनेकदा हॉट फ्लॅशेज आणि रात्री घाम येतो.
डॉक्टरांकडे कधी जावे ?
तापाकडे दुर्लक्ष न केलेलेच बरे. सौम्य ते तीव्र ताप असल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संसर्ग किंवा तापाचे त्वरित उपचार भविष्यात अधिक गंभीर गुंतागुंत टाळू शकतात.
सूचना : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.