संवादसेतू : जाऊ की नको?...

पावसात अडखळणाऱ्या आठवणी, जुन्या मैत्रिणींचा स्नेहमेळावा आणि ‘जाऊ की नको’ या द्विधा मनस्थितीतून मेधाचा बदललेला दृष्टिकोन
Small decisions to reconnect with loved ones often create lifelong happiness and strengthen relationships.

Small decisions to reconnect with loved ones often create lifelong happiness and strengthen relationships.

Sakal

Updated on

आनंदाचे छोटे छोटे प्रसंग आपल्यासमोर नेहमी येत असतात. घटकाभर ‘नॉस्टॅल्जिया’त रमून ताजंतवानं होण्याचे! पण ‘कारणं’ आडवी येतात. ती खरंच तितकी महत्त्वाची असतात का?

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेला पाऊस पुण्यात लागून राहिला होता. जुलैत आलेला यंदाचा पहिला पाऊस! आनंद तर होत होताच, पण बाहेर पडणं अपरिहार्य असलेल्यांची चिडचिड झाली होती. त्यातच मेधाच्या लक्षात आलं- उद्या रविवार! मेधाच्या शाळेतल्या ‘१० वी ब’च्या वर्गाचा स्नेहमेळावा होता. तिची शाळा मुलींची. खूप दिवसांपूर्वीच त्यांच्या वर्गातल्या दोघींनी पुढाकार घेऊन हा रविवार ठरवला होता. शाळेत पाराखाली भेटायचं आणि चक्क वर्गात बसून अंगतपंगत करायची, हे त्यांचं नियोजन सगळ्यांनाच आवडलं होतं. पण त्या वेळी कुठे माहिती होतं की आज इतका पाऊस पडणार आहे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com