आता 'या' चाचणीमुळे वयाच्या १८व्या वर्षी कळणार कर्करोगाचा धोका! अनुवांशिकतेवर क्लिनिक

cancer
cancer

मुंबई : अनुवांशिक दुर्मिळ कर्करोगाचा धोका किती याचे निदान होणे आता सहज शक्य आहे. प्रोएक्टिव्ह अनुवांशिक चाचणीमुळे आता १८ वर्षावरील लोकांना कर्करोग की आहे की नाही हे कळण्यास मदत होणार आहे. मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयानंतर आता उपनगरातील कोकिला बेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ही चाचणी आनुवंशिक कर्करोग क्लिनिकमध्ये उपलब्ध असेल, ज्याच्या लॉन्चची घोषणा रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अनिल अंबानी यांनी रविवारी केली.

१० टक्के कर्करोग अनुवांशिक

देशातील एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी १० टक्के कर्करोग अनुवांशिक म्हणजेच जेनेटिक कर्करोगाचे आहेत. तर, ९० टक्के कर्करोग हे व्यक्‍तीच्या बदललेल्या जीवनशैलीतून तयार होतात. रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री यांनी सांगितले की, सर्वच लोकांना जनुकीय कर्करोग होत नाही हे खरे आहे. त्यामुळे, अनुवांशिक कर्करोग दुर्मिळ कर्करोगाचा प्रकार आहे. तरीही अशा व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो.

भूतकाळात कर्करोग झालेल्या किंवा सद्यस्थितीत कर्करोग झालेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या अनुवांशिक कर्करोगाच्या धोक्याची चाचणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. आता, रुग्णालयातील अनुवांशिक कर्करोग क्लिनिकमध्ये 'जेनेटिक टेस्ट'द्वारे हा धोका ओळखता येणार आहे. या चाचणीद्वारे, एखाद्या व्यक्तीला हे कर्करोगाचे उत्परिवर्तन वारशापासून मिळाले आहे की नाही हे शोधता येते.

समुपदेशनाची वाढती गरज

मॉलिक्युलर पॅथॉलॉजीच्या सल्लागार डॉ. अमृत कौर यांनी सांगितले की, कर्करोगासंबंधी कोणतीही गोष्ट चिंतेने भरलेली असते, त्यामुळे या चाचण्या करण्यापूर्वी लोकांचे समुपदेशन केले जाते. चाचणीचा अहवाल चिंतेचे कारण बनणार असेल तर ते टाळण्यासाठी त्यांना कोणती उपाय योजना करावी लागेल हे ठरवण्यासाठी समुपदेशन चालू ठेवले जाते. त्यांनी सांगितले की, निगेटिव्ह जीन चे परिणाम सर्व चिंता संपवतात. चाचणीमध्ये ओळखल्या गेलेल्या उत्परिवर्तनाच्या प्रकारावर अवलंबून, ऑन्कोलॉजिस्ट धोका कमी करण्यासाठी विविध पर्याय लिहून देतात.

cancer
Barsu Refineray: उद्योगमंत्री सामंत अन् शरद पवार भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या

महिनाभरात चाचणी अहवाल

जनुकीय चाचणीच्या मदतीने महिनाभरात कर्करोगाचा धोका किती आहे हे कळते, असे डॉ. कौर यांनी सांगितले. या अनुवांशिक चाचणीमध्ये सुमारे १३० जनुकांविषयी माहिती मिळणे शक्य आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या जनुकापासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या जनुकापर्यंतची माहिती या चाचणीद्वारे मिळू शकते.

दरवर्षी १.४ मिलियन नवीन रुग्ण

भारतात दरवर्षी कर्करोगाच्या जवळपास १.४ मिलियन नवीन केसेसचे निदान केले जाते. कर्करोगावरील उपचारांच्या प्रभावामध्ये सुधारणा घडवून आणून या आजाराचे ओझे लक्षणीय प्रमाणात कमी करण्याची क्षमता प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आहे. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे, याच्या साहाय्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात. हा आजार होण्याची शक्यता आहे अथवा नाही हे कर्करोगाची लक्षणे दिसून येण्याच्याही आधी समजून येऊ शकते. कर्करोगासाठी उपचार धोरणे विकसित करण्यात हे खूप उपयुक्त आहे.

जेनेटिक टेस्टिंग महत्त्वाचे का आहे?

कर्करोगासाठी जेनेटिक चाचणींमुळे जेनेटिकमधील विशिष्ट बदल ओळखून व्यक्तीला आयुष्यभरात कर्करोग होईल की नाही याचे अनुमान लावण्यात मदत मिळते. जीनच्या या बदललेल्या रूपांचा कर्करोगाच्या धोक्याच्या बाबतीत हानिकारक, लाभदायक, तटस्थ, माहिती नसलेले किंवा अनिश्चित प्रभाव असू शकतात. सर्व कर्करोगांपैकी जवळपास १० टक्के कर्करोगामागे जेनेटिक कारण असू शकते. त्यामुळे रुग्णांमध्ये ही म्युटेशन्स ओळखल्यास रुग्णाच्या देखभालीत मदत मिळू शकते, आजार खूप लवकर लक्षात येऊ शकतो, त्याचे पूर्वनिदान केले जाऊ शकते, व्यवस्थापन करता येते, जोखीम कमी करता येते, टार्गेटेड थेरपी वापरता येते आणि कुटुंबातील इतर सदस्यांना किती धोका आहे हे देखील समजून घेता येते.

अनुवांशिक कर्करोग कोणते आहेत?

अनुवांशिक कर्करोग हे जेनेटिक असतात आणि त्यामधील म्युटेशन्स कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये पसरतात. जीन्समध्ये पॉझिटिव्ह रूपे असलेल्या व्यक्तींमध्ये अनुवांशिक कर्करोग सिंड्रोम असू शकतो आणि त्यांना काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. स्तन, अंडाशय, मोठे आतडे, स्वादुपिंड, मेलेनोमा आणि इतर काही प्रकारचे कर्करोग अनुवांशिक कर्करोग सिंड्रोम्सशी संबंधित असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com