
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये एकीकडे कुपोषण ही जशी खूप मोठी समस्या आहे तसेच दुसरीकडे स्थौल्य म्हणजेच लठ्ठपणा ही सुद्धा एक खूप मोठी समस्या आहे. लठ्ठपणाचे प्रमाण गावापेक्षा शहरांमध्ये, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. एक मात्र आहे, कुपोषित शरीर आणि स्थूल शरीर या दोहोंमध्ये एक साम्य आहे, त्या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससारख्या जीवनावश्यक पोषणमूल्यांचा अभाव आहे.
पोषणमूल्यांचा अभाव दोन्हीकडे असला तरी वजनाबरोबर अनेक आजार स्थूल माणसाला असतात. जाड माणसांची शरीरे बाहेरून अवाढव्य वाटली तरी त्यांच्यामध्ये ताकदीचा पूर्णपणे अभाव असतो. चार पायऱ्या चढायची वेळ आली, की त्यांना दम लागतो.