
The Truth About OCD
sakal
थोडक्यात:
काही लोकांना आजूबाजू स्वच्छ ठेवण्याची किंवा वारंवार हात धुण्याची सवय असते.
अनेकांना प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचीही सवय असते, जी OCD शी जोडली जाते.
OCD फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही; त्यामागे मानसिक कारणे आणि चिंता असते, असे डॉक्टर सांगतात.
आपल्या घरात, परिसरात, मित्रपरिवारामध्ये एखादा तरी व्यक्ती असा असतो, ज्याला आपल्या आजूबाजूचा सभोवताल कायम स्वच्छ लागतो. असेही बरेच जण असतात ज्यांना वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझर वापरण्याची सवय असते.
एवढेच नाही तर अनेकांना प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा करायचीही सवय असते. बरेचजण याला OCD असे म्हणतात. हा आजार नेहमी स्वच्छतेशी जोडला जातो. पण या आजारामागील काही तथ्य डॉक्टरांनी सांगितली आहेत, जी OCD या आजाराबाबत अधिक माहिती देतात.