Omicron: तुमचं मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाले तर काय करावे?

Omicron: तुमचं मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाले तर  काय करावे?
Summary

जगभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढक आहे .

मुलांमध्ये गंभीर लक्षण दिसत असल्यामुळे वाढली

कोरोना संकटामध्ये लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न वारंवार येत आहे की घरातील सदस्यातील कोरोना झाला किंवा एखाद्या लहान मुलाला कोरोना संसर्ग झाला तर पालकांनी त्यांची काळजी कशी घ्यावी. काही लोकांच्य मनात असाही प्रश्न आहे की पालकांना कोरोना झाला तर मुलांपासून किती काळ दुर विलगीकरणामध्ये रहावे? या सर्व प्रश्नांची उत्तर सीएनएन च्या मेडिकल अॅनालिस्ट डॉ. लिना वेन यांनी दिली आहे. डॉ. लीना वेन या जॉर्ज वॉशिंग्टन युनिवर्सिटी मिलकेन इंस्टीट्यूट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये इमरजन्सी फिजिशियन आणि हेल्थ पॉलिसी मॅनेजमेंटच्या प्रोफेसर आहे.

प्रश्न: विलगीकरण(Isolation) आणि क्वारटाईनमध्ये (Quarntine) काय फरक आहे?उत्तर : डॉ. लीना यांच्या मतानुसार, विलगीकरणआणि क्वारनटाईनमध्ये खूप फरक आहे. विलगीकरण(Isolation) गरज तेव्हा पडते जेव्हा तुम्हाला टेस्ट केल्यानंतर समजते की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहा. तेच क्वारनटाईन तेव्हा केले जाते जेव्हा तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येता पण तुमच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नाही किंवा तुमचा कोरोना रिपोर्ट येणार असे तर अशा स्थितीमध्ये क्वाराटाईन व्हावे लागते.

प्रश्न: जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पालकांना कोरोना झाला तर काय करावे?

उत्तर: कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा पालकांना कोरोनाची लागण झाल्या तर ताबडतोब इतरांपासून दूर राहा. घरामध्ये बाकी लोकांना त्वरीच तपासणी करून घ्या. घरातील इतर सदस्यांना देखील कोरोनाचे लक्ष असून शकतात.

प्रश्न : घरातील लहान मुलांना कोरोना झाला असेल आणि इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे? अशावेळी त्यांची काळजी कोणी घेतली पाहिजे

उत्तर : डॉ. लिलना यांच्या मतानुसार, हा अत्यंत कठीण काळ असतो. विशेषत: जर तुमचा मुलं अगदी लहान असते तेव्हा. कारण तुम्ही स्वत: त्याची काळजी घेऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या मुलांच्या वस्तू वेगळ्या करा जेणेकरून घरातील इतर सदस्य त्या वस्तूंच्या संपर्कात येणार नाही. संक्रमित मुलांना एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवा, तसेच त्याचे बाथरूम वेगळे ठेवा. कोरोना संसर्ग झालेल्या मुलांची काळजी घेताना तुम्हा २४ तास मास्क वापर जेणेकरून मुलांचे संक्रमण तुम्हाला होऊ नये.

जर तुम्ही सिंगल पालक आहात तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत खडतर असू शकतो. अशा वेळी घरामध्ये पुरेसे व्हेंटिलेशन असणे गरजेचे आहे. घराच्या दार, खिडक्या उघड्या असून द्या तसेच वारंवाप आपले हाथ स्वच्छ करा.

प्रश्न : विलगीकरण म्हणजे तुम्हाला पूर्णवेळ खोलीत बंद राहावे लागेल? तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा ताजी हवा घेऊ शकता का?

उत्तर: विलगीकरणाचा अर्थ असा आजिबात नाही की तुम्ही पूर्णवेळ खोलीमध्ये बंद राहावे लागेल आणि दुसऱ्यांपासून वेगळे राहायचे आहे. जर तुम्ही टाऊनहाऊस किंवा अपार्टमेंट अशा घरात असाल जिथे तुम्हाला ताजी हवा मिळत नाही तर तुम्ही बाहेर जाऊ शकता पण सावधगिरी बाळगा. इतरांपासून दूर रहा आणि बंद जागी लोकांसोबत थांबू नका.

प्रश्न : कोरोना संक्रमित व्यक्तीला किती काळ विलगीकरणामध्ये राहावे लागेल?

उत्तर : सीडीसीने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शतक तत्वांनुसार, विलगीकरणाचा कालवधी १० ऐवजी कमी करून ५ दिवस केला आहे. याचा अर्थ, तुम्हाला पाच दिवसांपर्यंत पूर्णपण आयसोलेट राहावे लागेल. त्यामुळे यानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता पण तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मास्क लावला आहे याची काळजी घ्या. तसेच लोकांपासून योग्य अंतर राखा. जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्हाला १० दिवस आयसोलेशमध्ये राहावे लागेल. या १० दिवसांमध्ये कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करू नका. तसेच घरामध्ये चांगल्या क्वालिटीचा मास्क वापरा आणि शक्य असल्यास वेगळ बाथरुमचा वापर करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com