
war stress children: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यात 27 निष्पात नागरिकांचा बळी गेला. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यांनी 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले. यालाच ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आले आहे.
देशभरात सैन्यांनी पार पाडलेल्या या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक होत आहे. पण नागरिकांच्या मनात चिंता तसेच भयाचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच याचा परिणाम लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील होत आहे. कारण गेले काही दिवस टिव्ही, सोशल मिडिया, बातम्यांमध्ये युध्दासारख्या परिस्थिती निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे. अशा वेळी लहान मुलांवर याचा काय परिणाम होतो आणि त्यांचे मनोबल कसे वाढवायचे हे जाणून घेऊया.