Traditional Food Matters
Sakal
आरोग्य
गर्भश्रीमंती स्वयंपाकघरातील
महागड्या वस्तूंपेक्षा प्रेमाने, शुद्धतेने आणि विचारपूर्वक बनवलेले घरचे अन्न हेच खरी गर्भश्रीमंती दर्शवते.
डॉ. मालविका तांबे
मध्यंतरी एका लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने एका नातेवाइकाकडे जाण्याचे झाले. तेथे गेल्यावर लहान मुलांशी संवाद साधत असताना जाणवले की प्रत्येक मुलाला महागडी गाडी कुठली आहे, कोणाकडे आहे याबद्दलचे कौतुक होते व त्याबद्दलची माहितीही होती. परंतु याच मुलांना तुमचा आवडता पदार्थ कोठला? असे विचारल्यावर पिझ्झा, बर्गर, फ्राइज वगैरे मोजक्या ४-५ पदार्थांची नावे पुढे आली. पुरणाची पोळी, उकडीचे मोदक, गव्हाचा चीक, तूप-मेतकूट-भात सारखे पदार्थ सुचवल्यावर कोणाच्याही चेहऱ्यावर फारशी ओळखही दिसत नव्हती. आधुनिक समाजात सगळीकडे श्रीमंती वाढते आहे असे निदर्शनास येत असताना समृद्धी व गर्भश्रीमंती मात्र कमी होत आहे याचे हे द्योतक आहे.