Chronic Inflammation : क्रोनिक इन्फ्लेमेशनवर मात

शरीरात दाह वाढल्यानंतर आपल्याला जुनाट आजार उद्‍भवण्यापूर्वी या क्रोनिक इन्फ्लेमेशनची अनेक लक्षणं अनुभवायला मिळतात.
Chronic Inflammation
Chronic InflammationSakal

डॉ. मृण्मयी मांगले

मागील भागात क्रोनिक इन्फ्लेमेशन (inflammation) म्हणजेच शरीरातील पेशी आणि रक्तातील दीर्घ काळ राहणारी सूज किंवा दाह याबद्दल जाणून घेतले. बहुतांश जुनाट आजार हे शरीरातील क्रोनिक इन्फ्लेमेशनमुळे होतात, हे हार्वर्ड मेडिकल स्कूल या सर्वोच्च संस्थेमधील वैज्ञानिक रिसर्चमध्ये आता सिद्ध झाले आहे. यावर मात करणे सोपे आहे, कारण आपली निसर्गनियमाच्या विरुद्ध असलेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे.

लक्षणे

शरीरात दाह वाढल्यानंतर आपल्याला जुनाट आजार उद्‍भवण्यापूर्वी या क्रोनिक इन्फ्लेमेशनची अनेक लक्षणं अनुभवायला मिळतात. खासकरून जेव्हा सर्व चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असतात, डॉक्टर आपल्याला कोणताही आजार नाही असं सांगतात; परंतु तरीही शरीरामध्ये खालीलप्रमाणे लक्षणे जाणवतात.

  • शरीरातील दीर्घकाळ चालणारी वेदना

  • तीव्र थकवा आणि निद्रानाश

  • नैराश्य, चिंता आणि मूड विकार

  • वारंवार अपचन होणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार आणि ॲसिड रिफ्लक्ससारखे पोटाचे विकार

  • वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे

  • वारंवार विषाणूंचे संक्रमण होऊन सर्दी-पडसे होऊन आजारी पडणे, केस गळणे, भूक न लागणे, सतत आजारी असल्यासारखे वाटणे

दाह कसा टाळावा?

पॅकेटमधील अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपण त्यातील सामग्रीची यादी वाचली किंवा हॉटेलमधील अन्न तयार होतानाची प्रक्रिया पाहिली, तर आपल्याला लक्षात येईल, की आपण ‘Refined wheat flour म्हणजे मैदा, कृत्रिम साखर, Preservative केमिकल, saturated fats (अतिरिक्त तेलकट पदार्थ), अतिरिक्त मसाले हे सर्व अती प्रमाणात सेवन करत आहे आणि हेच सर्व अन्न शरीरामध्ये हानिकारक दाह तयार करते. हे सर्व अन्न आपल्या प्रतिकारशक्तीला सतत trigger करतात व दाह उत्पन्न होऊन आंतरिक इजा होते. ज्याला आपण जंक फूड किंवा फास्ट फूड म्हणतो या अन्नसेवनाने शरीरातील TNf अल्फा, आयएल ६ असे घटक वाढलेले आढळतात आणि ते शरीरात दाह निर्माण करतात.

याचबरोबर व्यायाम नसणे, लठ्ठपणा, मानसिक ताण, कमी झोप आणि त्रासदायक नातेसंबंध हेही दाह वाढवतात असे सिद्ध झाले आहे.

दाह उत्पन्न करणारे पदार्थ टाळणे ही निरोगी होण्यासाठी सर्वोत्तम गुरुकिल्ली आहेच; त्याचबरोबर दाह कमी करणारे नैसर्गिक पदार्थ जाणीवपूर्वक सेवन केल्यास कॅन्सर, autoimmune आजार व अशा अनेक जुनाट आजारांचे प्रमाण कमी होईल.

दाह कमी करणारे अन्न

१. Omega-3 Fatty Acids - जवस, आक्रोड, मासे

२. जीवनसत्त्व सी - मोरावळा, च्यवनप्राश, लिंबूवर्गीय फळे. जीवनसत्व ई - बिया , नट्स , पालेभाज्या

३. पॉलिफेनॉल्स, अँटिऑक्सिडंट्सयुक्त फळे, भाज्या

४. प्रीबायोटिक अन्न : हे’फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात.

५. प्रोबायोटिक अन्न : पदार्थ तुमच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. आंबवलेले पदार्थ, दही, ताक, किमची, आम्बील.

लहान बाळाला लागते तशी किमान सात तासांची गाढ झोप, शारीरिक व्यायाम, मानसिक आणि भावनिक स्तरावर आनंदी आणि समतोल स्थितीत असणे, सुस्थितीतील नातेसंबंध अनुभवणे हे सर्व आपला दाह कमी करून आपल्याला जुनाट आजारांपासून वाचवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com