मनाचा सुवर्णयोग

भक्ती, विश्‍वास व उपवासातून मनाचे संतुलन साधा; शरीरावर नव्हे तर मनावर अधिराज्य मिळवूनच खरे सुख, समाधान व आरोग्य प्राप्त होते
Manacha Suvarnayog explains how Samarth Ramdas' Manache Shlok inspire devotion, inner peace, and mental stability for a balanced life.

Manacha Suvarnayog explains how Samarth Ramdas' Manache Shlok inspire devotion, inner peace, and mental stability for a balanced life.

Sakal

Updated on

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे

तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे।

श्री समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेल्या वरील श्र्लोकातील उपदेश आचरणात आणायला एवढा अवघड का वाटावा? परमेश्र्वर हे आनंदाचे रूप आहे, त्यामुळे मनुष्याला आनंद व सुख मिळणे म्हणजेच श्रीहरी मिळणे. भक्ती म्हणजे विश्र्वास, भक्ती म्हणजेच समाधान. तेव्हा भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यांना समाधानच मिळणार. विश्र्वासाच्या पंथाने जाणाऱ्यांना विश्र्वास मिळणार. पण मग या मार्गावर जायला अडचण कोठली? अडचण असते भीतीची. मनाला क्लेश होत असतील, मनात काही विकल्प येत असतील तर ते भीतीमुळेच येतात. रोग शरीरापर्यंत प्रवृत्त करण्याला जर काही कारण ठरत असेल तर ती आहे भीतीच. विश्र्वासाच्या मार्गाने जाण्याऐवजी मन भीतीच्या मार्गाने जायला लागले तर भरकटलेल्या मनाला वळविण्यासाठी उपयोगी असते ‘भक्ती’. म्हणून स्वामीजी म्हणतात, भक्तिमार्गाने जावे पण अनेक सबबी सांगता येतात व त्यातील मुख्य सबब म्हणजे ‘पोटाचा खळगा केवळ भक्तिमार्गाने भरत नाही’. कारण मनुष्याला अस्तित्व टिकविण्यासाठी शरीर टिकविणे गरजेचे असते. भूक लागली की समोर भाकरीच लागते, तेव्हा भक्ती ताटात वाढता येत नाही, मनुष्याच्या मनात ही सबब फार पूर्वीपासून रुजलेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com