

Overuse of Painkillers Can Damage Your Health
sakal
दुखणे अंगावर काढण्याच्या सवयीमुळे किंवा डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे वेदना दूर करण्यासाठी वेदनाशामक (पेनकिलर) गोळ्यांच्या वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पुढे ही सवय बनत असून डोकं दुखलं... घे गोळी... अंग दुखतंय... घे गोळी... दाढ दुखतेय... घे वेगळी गोळी... स्वतःच स्वतःचा डॉक्टर बनण्याच्या सवयीने वेदना दूर करण्याऐवजी पेनकिलर्समुळे अनेक आयुष्य वेदनेच्या विळख्यात अडकत आहेत. पेनकिलर्सच्या अतिवापरामुळे किडनी, हृदयरोगाच्या धोक्यासह ऍसिडिटी, ऍलर्जीसारखे गंभीर आजाराची जोखीम असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे.