नखुरडे उठलेय? अशी घ्या काळजी

नखुरडे उठलेय? अशी घ्या काळजी
Summary

हा प्रकार गंभीर नसला तरी त्रासदायक नक्कीच आहे. दुखऱ्या बोटामुळे काम करताना अडथळे येतात.

पॅरोनिकिया म्हणजे नखुरडे.(paronychia) ज्यामध्ये नखाच्या भोवताली संसर्ग होऊन दाह होतो. जीवाणू किंवा बुरशीमुळे (Bacteria or fungi) हा संसर्ग होतो. यामध्ये नखाच्या आजूबाजूची कातडी, नखाच्या खालच्या भागाला दाह होऊन सूज येते. ठणका बसायला लागतो आणि नंतर पू (pus) होऊ शकतो. हा प्रकार गंभीर नसला तरी त्रासदायक नक्कीच आहे. दुखऱ्या बोटामुळे काम करताना अडथळे येतात. (paronychia-symptoms-and-treatment-health-marathi-news)

कारणे

नखाच्या आजूबाजूस काही जखम झाली असल्यास किंवा कात्रा पडलेला असल्यास किटाणू तेथून आत शिरकाव करु शकतात.

बऱ्याच जणांना सतत नखे खाण्याची किंवा कुरतडण्याची सवय असते. त्यामुळे, नखाच्या आजूबाजूला इजा पोहोचू शकते.

हाताच्या स्वच्छतेसाठी पार्लरमध्ये मॅनिक्युअर करीत असताना जोरात दाबल्यास त्वचेला इजा पोहोचू शकते.

आतल्या बाजूला वाढणारी घट्ट नखे, अस्वच्छता

नखुरडे 2 प्रकारचे असतात

त्रासाच्या तीव्रतेवरुन व त्रास किती काळासाठी होतो यावरुन याचे ॲक्युट व क्रोनिक असे वर्गीकरण केले जाते.

ॲक्यूट प्रकार : यामध्ये त्रासाला अचानक सुरवात होते. तीव्रता अधिक असते. वेदनाही खूप होतात. सुजेचे प्रमाणही अधिक असते. नखाच्या बाजूबाजूचा भाग लालभडक होऊन गरमही होतो. शक्यतो या प्रकाराला जीवाणू कारणीभूत ठरतात. हा त्रास औषधोपचाराने एक-दोन दिवसांत आटोक्यात आणता येऊ शकतो. यात एकावेळी एखाद्या नखालाच त्रास होतो.

क्रोनिक प्रकार:या प्रकारात त्रासाची सुरवात हळुवारपणे होते. सूज, वेदना किंवा लालसरपणा हळूहळू येतो. त्याची तीव्रताही फारशी नसते. त्वचा किंचित लालसर किंवा फिकट गुलाबी होऊन त्यावर एकप्रकारचा चकचकीतपणा असतो. नखावर खडबडीत रेषा येतात आणि डागसुध्दा दिसतात. या प्रकाराला बुरशी कारणीभूत ठरते. म्हणून हा प्रकार जास्त करुन पाण्यात अधिकवेळ काम करणाऱ्यांना होतो. मधुमेह झालेल्या व्यक्तिंनाही असा त्रास होऊ शकतो. या प्रकारात संसर्ग झाल्यास एकाचवेळी अनेक नखांना किंवा बोटांना त्रास होतो आणि हा त्रास अनेक दिवसानंतर कमी होऊ शकतो. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सुरु होऊ शकतो.

होमिओपॅथी उपचार

बेलाडोना - ॲक्युट प्रकारात उपयुक्त. यात नखाच्या आजूबाजूचा भाग वेदनेने ठणकून लालभडक होऊन सुजलेला असतो.

हेपार सल्फ - पू व्हायला सुरवात झाल्यानंतर हे औषध दिले जाते. नखे गळून पडतात.

नॅट्र्म सल्फ- यात नखाच्या मुळाशी जास्त दाह होतो.

सिलिशिया - दाह लवकर आटोक्यात येत नाही. तेव्हा क्रोनिक प्रकारात जास्त उपयुक्त. याशिवाय कॉस्टीकम, मिरीक्टीका, मॅगकार्ब यासारखी औषधे उपयुक्त ठरतात. नखांची स्वच्छता, देखभाल घेऊन सततचा ओलसरपणा टाळावा.

- डॉ. रचना शानभाग, मंगळवार पेठ, टिळकवाडी

(paronychia-symptoms-and-treatment-health-marathi-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com