
Mental Health: वीकेंड म्हणजे सुट्टीचा दिवस; आपल्याला कामातून थोडासा ब्रेक मिळावा यासाठी यादिवसांचं प्रयोजन आहे, आठवडाभर कष्ट केल्यानंतर सगळ्यांना आराम हवा असतो. पण सध्याची एकूण परीस्थिती बघता लोकं विकेंडला एंजॉय कमी डिप्रेस जास्त असतात.
एक गोष्ट जी आपण प्रखर्षाने ऐकतो अन् ती म्हणजे माझा झोन लागला आहे, खूप ओव्हरथिंकींग होतं आहे, काय घडतं आहे हेच कळत नाहीये, याचं प्रमाण विकेंडला जास्त असतं.
ओव्हरथिंकींग का होतं?
ओव्हरथिंकिंग का होतं याचं एक असं कारण नाही, अनेकदा लोकं एका विशिष्ट विषयावर किंवा परिस्थितीवर खूप अति विचार करत बसतात, याची अनेक कारणं असू शकतात. जेव्हा आपण अतिविचार करतो तेव्हा आपलं मन इतर विषयांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही; ओव्हरथिंकिंगची पुढची पायरी म्हणजे डिप्रेशन.
वीकेंडला असतात लोकं जास्त डिप्रेस
वीकेंडला लोकं सहसा घरीच असतात, आठवडाभर कामाच्या वैतागानंतर लोक सुट्टीच्या दिवशी घरीबसून आराम करण्याला प्राधान्य देतात किंवा अनेकदा वर्कलोडच इतका असतो की सुट्टीच्या दिवशीही कामं असतात. त्यात वाढत्या महागाईमध्ये दर आठवड्याला बाहेर फिरणं परवडणारही नाही.
सोशल मिडियाचा वाढता वापर हानिकारक आहे, सायकोलॉजिस्ट म्हणतात की आपल्या मेंदूला तेवढीच माहिती द्या ज्याची त्याला गरज आहे, उगाच हा काय करतोय? तो कसा जगतोय यावर लक्ष केंद्रित करू नका कारण याने आपण कुठेतरी त्यांचं आणि आपलं आयुष्य कम्पेयर करू लागतो, आपल्याला हवं तसं आयुष्य जगता येत नाहीये असं म्हणत त्रास करून घेतो..
यातून कसं बाहेर पडाव?
1. सर्वात आधी आपली ओव्हरथिंकिंग होते आहे हे मान्य करा, आपण उगाच प्रत्येका गोष्टीचा अति विचार करून स्वतःला त्रास करणं बंद करा.
2. मनात चालणाऱ्या गोष्टी कागदावर लिहून काढा, अनेकदा आपल्याला लोकांचा राग येत असतो पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून आपण काही बोलत नाही, सगळं काही मनात ठेवतो आणि मनातल्या विचार करत बसतो त्यापेक्षा त्या गोष्टी सरळ लिहून काढा.
3. रोजच्या रोज आपल्या प्रायोरिटी सेट करा, आज नक्की काय करायचं आहे हे ठरवा आणि त्यानुसार आपलं दिवसाचं नियोजन करा.
4. आपल्या मेंदूला जितकी गरज आहे तितकीच माहिती पुरवा. उगाच गोष्टी पुरवू नका.
5. आपले छंद जोपासा.. त्यासाठी नियोजन करा.
6. ओव्हरथिंकिंग करणाऱ्या लोकांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करा. याने तुम्ही अजून जास्त लो फील कराल.
7. स्वतःला टाइम बाउंड डिसीजन घेयला भाग पाडा, मला या वेळात हे काम करायच आहे असे गोल सेट करा.
8. स्वतःला कमी लेखू नका, कोणीतरी तुमच्याहून बेस्ट आहे अशी तुलना करू नका.