
Side Effects of Period Delay Pills: दिल्लीतील १८ वर्षीय मुलीने मासिक पाळी लांबवण्यासाठी गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला डीप पेन थ्रोम्बोसिस झाल्याचे नमूद केले. अशा प्रकारच्या गोळ्यांचे सेवन महिला जास्त प्रमाणात करतात. आजकाल व्यस्त जीवनशैली, प्रवास, लग्नसमारंभ किंवा इतर कारणांमुळे अनेक महिला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधांचा वापर करतात. ही गोळी तात्पुरती सोय करून देते, मात्र, महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणामही करते.
पाळी रोखण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांमध्ये हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्त गाठी, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांचा धोका वाढतो. विशेषतः ज्या महिलांना आधीपासून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता किंवा धूम्रपानाची सवय आहे, त्यांच्यासाठी या गोळ्या अधिक धोकादायक ठरू शकतात. काही वेळा अचानक मृत्यू होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.