Physiotherapy
sakal
- डॉ. अपूर्व शिंपी, संचालक, सिंबायोसिस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे
‘कंबर दुखते म्हणून बसून राहतो’, ‘गुडघे दुखतात म्हणून जिना टाळतो’, ‘संगणकासमोर तासन्तास बसल्यामुळे मान आखडते’, हे वाक्य तुम्ही किती वेळा ऐकलंय? खरं तर हे फक्त वयामुळे किंवा आजारपणामुळे नाही, तर आपल्या जीवनशैलीतील चुका यामागे कारणीभूत आहेत. संगणक, मोबाईल, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव, या सगळ्यामुळे शरीर हळूहळू थकायला लागतं.