
Health problems caused by pigeon droppings: शांततेचे प्रतीक असणाऱ्या कबुतरांना चित्रपटांमधून प्रेमाचा संदेश पोहोचविणारा संदेशवहक दर्शविण्यात आले आहे. मात्र, याच पक्ष्यामुळे गंभीर आजार पसरत असल्याचे संशोधनातून पुढे आले. मुंबई-पुण्यातील कबुतरखान्यांवर नियंत्रणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील वैद्यकीय तज्ज्ञांसोबत चर्चा केली असता त्यांनी कबुतरांच्या पंखांची पिसं आणि विष्ठेतील विषाणूंमुळे फुफ्फुसाच्या आजारांना (हायपरसेंसिटीव्हिटी न्यूमोनियटीस) निमंत्रण मिळत असल्याचे सांगितले. खबरदारीचा इशाराही त्यांनी दिला.