
Spiritual Reflection
Sakal
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
ज्ञानाची महती अगाध आहे. भारतीय शास्त्रे कोणी पैसे मिळविण्यासाठी पेटंट वगैरे घेऊन केलेली नाहीत; तर परंपरेने मनुष्यजातीच्या कल्याणासाठी अनेकांच्या संयुक्त प्रयत्नांतून लावलेले शोध संकलित करून ही शास्त्रे तयार झालेली आहेत. असे वागावे, असे करावे अशा अनेक गोष्टी या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. या शास्त्रांचा उपयोग करून घेतला, त्यातील ज्ञानाचा आदर केला तर आपले जीवन सोपे होऊ शकते, समाजाशी असलेले संबंध सुधारू शकतात. भारतीय परंपरेत जीवन जगण्याचे काही नियम बांधून दिले आहेत, जीवनाची रूपरेषा आखून दिली आहे. यात महत्त्वाचा आहे पितृपक्षाचा पंधरवडा.