
Post-COVID Rise In Cancer Cases In Solapur
Esakal
प्रकाश सनपूरकर
Solapur: जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण मागील चार वर्षांत म्हणजे कोरोनानंतरच्या काळात दुपटीने वाढल्याचे शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. केमोथेरपीसाठी येणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या केवळ उशिरा होणाऱ्या निदानामुळे वाढत आहे. २०१९ साली असलेली तीन हजाराच्या टप्प्यात असलेली कर्करुग्णांची आकडेवारी कोरोनानंतर ८ हजारांच्या घरात गेली आहे.