Post-Spine Surgery Care and Rehabilitation
sakal
- डॉ. अजय कोठारी, स्पाइन सर्जन
डॉक्टर, ऑपरेशन झालं की मी पूर्णपणे बरा समजायचं का?’’ स्पाइन सर्जरीनंतर रुग्ण विचारत असलेला हा सर्वात सामान्य प्रश्न आहे. अनेकांना वाटतं, की शस्त्रक्रिया म्हणजे उपचाराचा शेवट; पण प्रत्यक्षात शस्त्रक्रिया हा प्रवासाचा शेवट नसून एका नव्या टप्प्याची सुरुवात असते. यशस्वी स्पाईन सर्जरी महत्त्वाची असतेच; पण त्यानंतरची काळजी, व्यायाम, फिजिओथेरपी आणि जीवनशैलीतील बदल तितकेच महत्त्वाचे असतात. ऑपरेशनमुळे समस्या दूर होते; पण शरीराला पूर्ववत कार्यक्षम बनवण्यासाठी पुनर्वसनाची गरज असते.