Postpartum Thyroiditis After Delivery
esakal
बाळाच्या जन्मानंतर आईच्या आयुष्यात अनेक बदल होतात. धावपळ, झोपेची कमतरता, हार्मोन्समधील बदल आणि बाळाची सततची काळजी यामुळे थकवा, मूडमध्ये बदल किंवा वजनात चढ-उतार होणं सामान्य मानलं जातं. मात्र, हीच लक्षणं काही वेळा थायरॉईडायटिसचीही असू शकतात. डिलिव्हरीनंतर पहिल्या वर्षात काही महिलांना ही समस्या जाणवू शकते. विशेष म्हणजे, याची लक्षणं प्रसूतीनंतरच्या रोजच्या त्रासांसारखीच वाटत असल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होतं.