Ashwagandha : अश्वगंधाचे फायदे

अश्वगंधाचा उत्तम फायदा मिळवण्यासाठी त्याचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे, याचीही माहिती घेऊयात.
Ashwagandha
AshwagandhaSakal

- विकास सिंह

अश्वगंधा या शब्दाची फोड केल्यास तुम्हाला दोन शब्द मिळतील...अश्व आणि गंध. ज्याचा शाब्दिक अर्थ घोड्याचा वास असा होतो. याचबरोबर या शब्दाचा अर्थ घोड्याकडे असलेला जोम आणि शक्ती देखील असू शकतो.

अश्वगंधा औषधी वनस्पती आहे. अश्वगंधा विविध अभ्यास आणि संशोधनांद्वारे जागतिक स्तरावर ओळखली जात आहे. चला तर मग या वनौषधीचे फायदे जाणून घेऊया. अश्वगंधाचा उत्तम फायदा मिळवण्यासाठी त्याचे किती प्रमाणात सेवन केले पाहिजे, याचीही माहिती घेऊयात.

अश्वगंधाचा सर्वांत महत्त्वाचा औषधी फायदा म्हणजे तणावमुक्ती. आपण वेगवान जगात राहतो. त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्यावर ताण येतो. अश्वगंधामध्ये आपल्या मेंदूच्या त्या भागावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असू शकते.

आपल्या शरीरात कॉर्टिसॉल तणाव संबंधित हार्मोन तयार करण्यासाठी जबाबदार आहे. यामुळे कॉर्टिसॉलची पातळी कमी होऊन तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. चिंता कमी करण्यासाठीही अश्वगंधा चांगला उपाय मानला जातो.

स्टेजवर सादरीकरणासाठी येण्यापूर्वी किंवा गर्दीसमोर भाषण करण्यापूर्वी विचित्र, अस्वस्थ भावना येते, बरोबर? तुमचे स्नायू किंचित घट्ट वाटतात आणि काही वेळा तुम्ही क्षणात एका ठिकाणी गोठून जाता.

चिंताग्रस्त असल्याचे ते लक्षण आहे. अश्वगंधामध्ये या चिंतेच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. तुम्हाला ताण असतानाही चांगली कामगिरी करण्यास मदत होऊ शकते. या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असल्याचे देखील म्हटले जाते. आपले शरीर बनवणाऱ्या पेशी कोणत्याही ऑक्सिडेटिव्हचे नुकसान होण्यापासून संरक्षित राहतात. त्यामुळे

एखाद्या व्यक्तीला वयामुळे उद्‍भवणाऱ्या समस्यांपासून शरीराचे रक्षण करण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर मधुमेह, कर्करोग आणि न्यूरोडिजेनेरेटिव्ह व्याधींपासूनही दूर राहण्यास हातभार लागतो.

अश्वगंधामध्ये तुमचा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळे छातीतील कोणत्याही प्रकारचे दुखणे कमी होऊ शकते आणि तुमचे हृदय रोगांपासून सुरक्षित राहते.

अश्वगंधा वनस्पतीचे मूळ सेवन केल्यावर तुमचे हृदय श्वसन आरोग्य वाढण्यास मदत करते. याचा अर्थ असा, की जे लोक कोणत्याही प्रकारच्या ॲथलेटिक क्रियाकलापांमध्ये भाग घेतात ते औषधी वनस्पतींचे सेवन करू शकतात आणि त्यांना त्यांच्या क्षमतेत वाढ दिसून येईल.

आता त्याचे किती प्रमाणात सेवन करणे योग्य आहे, हे जाणून घेऊया. अश्वगंधाची इष्टतम मात्रा ५००-६०० मिलिग्रॅम प्रतिदिन असावी. ती दररोज सुमारे अर्धा चमचा ते एक चमचा असते.

अश्वगंधाचे कोणत्याही फायद्यासाठी सेवन करताना, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अश्वगंधा हे पूर्णपणे औषध नाही. तुम्हाला त्रास होऊ शकतो अशा कोणत्याही परिस्थितीसाठी ते वास्तविक औषधांना पूरक म्हणून वापरले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, ते साहाय्यक भूमिका बजावू शकते.

या वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि त्याचा आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन करू नये. सेवनाचे प्रमाण व्यक्तीनुसार बदलू शकते. यासाठी त्याचे सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com