Understanding the True Meaning of Pranayam
sakal
‘प्राण जाए पर वचन न जाए’ हे वचन आपणा सर्वांनाच परिचित आहे. काही माणसे तर ‘प्राण गेला तरी बेहतर’ पण ‘मोडेन तरी वाकणार नाही’ असे म्हणतात. ‘प्राण जाईपर्यंत फाशी’ असे काहीसे म्हटले जाते. असंख्य लोक नियमाने प्राणायाम करतात. पण एक मजा अशी की या बहुतेक सर्व लोकांना मुळात ‘प्राण’ म्हणजे काय हेच माहीत नसते. वैज्ञानिकांनी पण अनेक प्रयोग करून प्राण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. परमहंस श्री योगानंद यांच्या देहत्यागाच्या वेळी अमेरिकेत काचपेटी वगैरे करून शरीर सोडून जाणारा प्राण पकडण्याची योजना आखली गेली. पण सरतेशेवटी त्यांचा प्राण निघून गेला, पेटी मात्र रिकामी होती.