Premature Babies Now Safer with Advanced Technology
sakal
आरोग्य
Premature Babies Now Safer: वेळेआधी जन्मलेली बाळं आता जास्त सुरक्षित; तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढतंय प्रिमॅच्योर बाळांचं आयुष्य
Premature Baby NICU Innovations: अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वेळेआधी जन्मलेल्या बाळांचं जगण्याचं आणि विकासाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
Premature Baby Care: गर्भावस्थेत आईला होणारा रक्तदाब, मधुमेह, संसर्ग त्याचबरोबर 'आयव्हीएफ' प्रक्रिया व विवाहाचे वाढलेले वय, यामुळे कमी वजनाचे व पूर्ण दिवस भरण्याआधीच अकाली प्रसूतीद्वारे बाळ (प्रीमॅच्युअर) जन्मण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, बदलते वैद्यकीय तंत्रज्ञान, औषधे व इतर उपाययोजनांमुळे बाळ जगण्याचे प्रमाण सुधारले आहे. केवळ जगण्याचेच नव्हे; तर गुणवत्तापूर्ण विकास होण्याचेही प्रमाण वाढले आहे.
