कर्करोगाची लक्षणे अनेक वेळा अतिशय साध्या शारीरिक समस्यांसारखी वाटतात, आणि घरातील जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेल्या महिलांना ही लक्षणे जाणवली, तरी त्या त्याकडे दुर्लक्ष करतात.
कर्करोगासारख्या गंभीर आजारांबाबत बोलताना आपण नेहमी उपचार, डॉक्टर्स आणि निदान यावर लक्ष केंद्रित करतो; पण अनेकदा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतो... महिलांनी स्वतःची काळजी घेणे.